Ad will apear here
Next
या सचिनचा असाही सिक्सर..
सहा चित्रपटांचा कार्यकारी निर्माता सचिन दुबाले पाटील
पुणे : ‘सचिन’ हे नाव प्रत्येक माणसाच्या हृदयाजवळचे. या नावाची जादूच अशी आहे. भारतरत्न सचिन तेंडूलकर, सचिन पिळगावकर यांनी या नावाला एक वलय प्राप्त करून दिले आहे. या नावाचा हा वारसा घेऊन आणखी एक सचिन आपले नाव गाजवण्यास सज्ज झाला आहे, तो म्हणजे सचिन दुबाले पाटील. अल्पावधीत सहा चित्रपटांचा कार्यकारी निर्माता बनलेल्या सचिनने सिक्सरच ठोकला आहे.  

सध्या चित्रपटसृष्टीत त्याच्या नावाचे वादळ घोंगावत आहे. मूळचा बीडचा असणारा हा युवक कामानिमित्ताने पुण्यात आला. अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड देत त्याने मिळेल ते काम करायला सुरुवात केली. आज तो मराठी चित्रपटांचा कार्यकारी निर्माता बनला आहे. जवळपास अर्धा डझन चित्रपटांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून त्याने चोख कामगिरी बजावली आहे. मोठ्या हिमतीने तो या अस्थिर चित्रपटसृष्टीत प्रामाणिकपणे काम करतोय. बहुचर्चित बिग बजेट, मल्टीस्टारकास्ट ‘अ. ब. क’ या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणूनही त्याने धुरा संभाळली होती. 

आटपाडी नाईट्स, खिचीक, कॉलेज डायरी असे त्याचे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सचिनला या वाटचालीत साथ मिळाली आहे ती त्याचा जीवाभावाचा मित्र विष्णू घोरपडे याची. आता ही घोडदौड अशीच कायम ठेवायची सचिनची महत्त्वाकांक्षा आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZXIBW
Similar Posts
‘लक्ष्मीकांत आणि अभिनय यांची अभिनयशैली वेगळी’ पुणे : ‘लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनय बेर्डे यांच्यात अनेक गोष्टींचे साम्य असले तरी दोघांची अभिनयाची शैली मात्र वेगळी आहे,’ असे अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नमूद केले.
पुण्यात रंगला ‘हॅवमोर आइस्क्रीम मिर्ची म्युझिक अॅवॉर्ड’ सोहळा पुणे : संगीत, नृत्याच्या साथीने रंगलेला ‘हॅवमोर आइस्क्रीम मिर्ची म्युझिक अॅवॉर्ड’ सोहळा नुकताच रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मोठ्या जल्लोषात पार पडला. २०१८ हे वर्ष मराठी संगीत क्षेत्रासाठी आश्वासक ठरले, या सोहळ्यात दिग्गजांचा गौरव करत मराठी संगीत क्षेत्राला मानाचा मुजरा करण्यात आला.
मोहन जोशी दिसणार इरसाल पुणेकराच्या भूमिकेत पुणे : १४ विद्या आणि ६४ कलांबद्दल आपल्याला माहित आहे, अलीकडच्या काळात जाहिरात ही ६५ वी कला म्हणून नावारूपाला आलेली आहे. यात आता आणखी एका कलेची भर पडली असून, ही ६६ वी कला नेमकी कोणती? हे सांगण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी ‘६६ सदाशिव’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
‘मराठी चित्रपटसृष्टी व कलाकारांना सुगीचे दिवस’ पुणे : ‘सध्या मराठी चित्रपटसृष्टी चांगल्या संक्रमणातून चालली असून,यामुळे मराठी कलाकारांनाही सुगीचे दिवस आले आहेत.कलाकारानेही रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाला प्रामाणिकपणे जागून, त्यास आपल्या अभिनयाने प्रेमाचीच पावती देणे क्रमप्राप्त आहे’,असे मत मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी याने व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language